ताज्या बातम्यारणधुमाळी

“एक आरोपी लपवला जातोय”,भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ यांचं खळबळजनक विधान!

मुंबई | Chitra Wagh’s Statement In Discussion – भंडाऱ्यात 35 वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोन आरोपींना अटक केली आहे. तसंच अद्याप एक आरोपी फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. परंतु या गुन्ह्यात तीन नाही चार आरोपी असून पोलीस एका आरोपीला लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं खळबळजनक विधान भाजप उपप्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलं आहे. भंडारा बलात्कार घटनेतील पीडितेची भेट घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चित्रा वाघ यांनी हे विधान केलं आहे.

पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. भंडारा जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अजूनही पीडितेच स्टेटमेंट घेतलेलं नाही. पोलीस तीन आरोपी सांगत असले तरी पीडितेनं डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार चार आरोपी आहेत. एका आरोपीला लपवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी डॉक्टरांशी भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने पीडितेवर अत्याचार करण्यात आला आहे. पीडितेवर एक शस्त्रक्रिया झाली असून आणखी एक मोठी शस्त्रक्रिया होणे बाकी आहे. परंतु या त्रासामुळे तिला अन्न गिळताही येत नसल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. गरज भासल्यास पीडितेला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून तिच्यावरील सर्व उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचंही वाघ म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये