ताज्या बातम्यामहाराष्ट्र

साताऱ्याच्या पुसेसावळी गावात दोन गटांमध्ये संघर्ष, एकाचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

सातारा | Satara News – सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी (Pusesavali) गावात दोन गटांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेंकावर दगडफेक करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. तसंच तेथे जाळपोळ देखील करण्यात आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना काल (10 सप्टेंबर) रात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर संबंधित परिसरातील इंटरनेट सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे पुसेसावळी गावात दोन गटांमध्ये राडा झाला. या दोन्ही गटांमधील संघर्ष इतका टोकाला गेला की यावेळी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या प्रकारानंतर पुसेसावळी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसंच या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात हिंसा भडकू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

दरम्यान, पुसेसावळीमध्ये काल रात्री आठच्या सुमारास 500 हून अधिकचा जमाव भाजी मार्केटकडे आला. यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं आणि भाजी मार्केटमधील दुकानांचं नुकसान झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये