सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसची मोठा ‘त्याग’ करायची तयारी!

मुंबई : (Congress Leader Sunil Kedar On Statement) सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. काँग्रेसने कधीही छत्रपतींच्या नावाला विरोध केलेला नाही. यामुळे काँग्रेसबद्दल द्वेष बाळगण्याचे कारण नाही. मनात काही द्वेष असेल तर काँग्रेस बाहेर राहून महाविकास आघाडीला सहकार्य करेल, असे आश्वासन दिल्याचे सुनील केदार म्हणाले.
दरम्यान, केदार म्हणाले, सरकार बहुमत चाचणीला शंभर टक्के समोर जाणार की नाही, हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच ठरेल, असेही सुनील केदार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या कठीण काळात चांगले काम केले हे सर्वांना माहिती आहे.
काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हे सरकार स्थापन करण्यासाठी कठीण निर्णय घ्यायलाही तयार आहेत. काँग्रेसबद्दल कोणाच्या मनात द्वेष असेल तर काँग्रेस बाहेर राहून सहकार्य करण्यास तयार आहे, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले.