पुणे महापालिकेच्या कर्मचार्याना गणवेशन अवडेना

पुणे : पुणे महापालिकेतील कामकाजाचा एक भाग म्हणून आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विभाग प्रमुख, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यासह अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील शिपायांसाठी गणवेश निश्चीत केला आहे. त्यासाठी शिपायांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.परंतु या गणवेशाकडे आता दुर्लक्ष होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. कर्मचारी कोण हेच तेथे कामानिमित्त येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही .नक्की चौकशी कोणाकडे करायचे हेच समजत नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडत असल्याच्या तक्रारी सतत केल्या जात आहेत.
तसेच महिला शिपायांसाठी पांढरी साडी, ब्लाऊज पीस, शिलाई, ऑफिस बॅग, चप्पल जोड, वुलन जर्सी, रेनकोट यासाठी दरवर्षी ३ हजार २२५ रुपये दिले जातात. तर पुरुष शिपायांना पांढरा शर्ट, पॅन्ट, ऑफिस बॅग, चप्पल जोड, वूलन जर्सी, रेनकोटसाठी दोन वर्षासाठी ७ हजार १९६ रुपये दिले जातात. महापालिकेत सध्या ६३ महिला शिपाई तर ३५३ पुरुष शिपाई सेवेत आहेत. यांच्या गणवेशावर महापालिका सुमारे ३० लाख रुपये खर्च करत आहे. गेल्या आठवड्यात या ४१६ स्त्री व पुरुष सेवकांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे.परंतु अधिकाऱ्याच्या केबिनच्या बाहेर रंगेबीरंगी शर्ट, जिन्स, स्पोर्ट बुट घालून सेवक पाहायला मिळतात.
परंतु महापालिकेच्या नियमानुसार गणवेशात कामावर येणे आवश्यक आहे असं विभागप्रमुखानी सांगितलं. जर नियमांचं पालन केलं नाही तर कठोर कारवाई केली जाईल असं हि महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे .