ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी! नितीन गडकरींना दाऊदच्या नावानं खंडणीसाठी फोन, जीवे मारण्याची दिली धमकी

नागपूर | Nitin Gadkari – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूर (Nagpur) येथील कार्यालयात धमकीचा फोन आला होता. तसंच अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) नावानं त्यांना धमकी देण्यात आली असून खंडणीचीही मागणी करण्यात आली आहे.

नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळताच नागपूर पोलिसांसह एटीएस, एएनओसह अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. तसंच गडकरींच्या वर्धारोडवरील निवासस्थानावर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयाजवळ पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामल्यात नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजता धमकीचा फोन आला होता. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीनं दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचं सांगून नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच त्यानं काही सेकंदातच फोन कट केला. त्यानंतर फोन घेणाऱ्यानं लगेच भाजप पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. तर अर्ध्यातासातच गडकरींच्या संपर्क कार्यालयास पोलिसांनी वेढा घातला असून दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाच्या पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये