ताज्या बातम्यारणधुमाळी

तानाजी सावंत यांचं मराठा आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

मुंबई | Controversial Statement Of Tanaji Sawant On Maratha Reservation- राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) आक्रमक झाला आहे. काल (25 सप्टेंबर) उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली होती. मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. मात्र, आता पुढील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टिकाऊ आरक्षण मिळवून देतील, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे.

तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चानं संताप व्यक्त केला आहे. तसंच त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून आपल्या वक्तव्यावर माफी मागा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्ही सामान्य मराठे आहोत तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही. तानाजी सावंत यांनी सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी योगेश केदार यांनी केली आहे. तसंच पुढे ते म्हणाले, तुम्ही भाषणात काय बोलत आहात? तुम्हाला काही भान राहिले आहे का? तुम्हाला उघड समाजाच्या भूमिकेसोबत येणं शक्य नसेल तर कमीत कमी विरोध तरी करू नका. तरी आपण जी समाज विरोधी भूमिका घेतली त्याबद्दल समाजाची माफी मागा असेही केदार यांनी म्हटलं आहे. ‘मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण’ ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. तुमचं सरकार आलं म्हणून आम्ही आंदोलनं सुरू केली असे बिन बुडाचे आरोप करू नका. तुमचं सरकार आलं म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की समाज काहीही बोलले तर सहन करेल, अशा शब्दात योगेश केदार यांनी तानाजी सावंत यांना सुनावलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये