एका (च) टाळीची दाद

नवनिर्मिती हे परिवर्तनाचे सूत्र, भावनेपेक्षा सुविधा महत्त्वाची
पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक असलेले बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्माणाचा विषय गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. या चर्चेला आता गती आली आहे. बालगंधर्व रंगमंदिर पाडू नये, यासाठी अनेक कलाकार आणि रसिकांनी पुढाकार घेतला आहे, तर दुसरीकडे येथे पुनर्निर्माण व्हावे, ही आग्रही भूमिका काहींनी मांडली आहे. बालगंधर्व महोत्सवाच्या व्यासपीठावर रंगभूमी आणि रंगमंदिर या परिसंवादात ज्येष्ठ संपादक मुकुंद संगोराम, राजश्री दातार, अभिनेते माधव अभ्यंकर यांच्यासोबत मी सहभाग घेतल्यावर हे रंगमंदिर पाडण्याच्या भूमिकेला समर्थन दिले आणि एकाच टाळीची दाद मिळाली !
बालगंधर्व रंगमंदिर ही पुण्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची, संस्कृतीची अस्मिता आहे. ते या प्रदीर्घ आणि वैभवशाली चित्र-नाट्य संस्कृती परंपरेचा द्योतक आहे. यामध्ये संदेह नाही. त्यामुळे अनेक पुणेकरांनी हे बालगंधर्व रंगमंदिर पाडू नये, अशी भूमिका घेतली आहे. अर्थात, ही भूमिका प्रथम दहा कलाकार आणि रंगभूमी मंडळींनी घेतली, यांचा फॉलोअर्स असलेल्या रसिकांनी त्यांची री ओढली. बालगंधर्व महोत्सवामध्ये हा विषय आल्यानंतर मी सर्वप्रथम या रंगमंदिराच्या अस्तित्वाविषयी माझ्या मनामध्ये असलेली श्रद्धा व्यक्त करीत पुनर्निर्माणाचा आग्रह मांडला. यावर अनेक मतमतांतरे झाली. विरोध झाला आणि व्यक्तिशः मला अभिनंदनासहित विरोधीही फोन आले.
बालगंधर्व रंगमंदिराच्या महत्त्वाबाबत कोणाच्याही मनामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. ५४ वर्षांच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार म्हणून हे बालगंधर्व रंगमंदिर उभे आहे. सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि मराठीचे मानबिंदू असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून या बालगंधर्वची निर्मिती झाली आणि त्यांच्याच योग्य कल्पनेतून आणि आराखड्यातून हे रंगमंदिर उभारले गेले. त्यामुळे पुणेकरांची यावर असलेली भक्तीही आपण समजू शकतो. तथापि, परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. मंदिरांचादेखील जीर्णोद्धार करावा लागतो. तो जीर्णोद्धार करीत असताना त्या मंदिरात असलेली सर्वांची श्रद्धा असलेली महादेवाची पिंड कधी अपवित्र होत नाही, तर तिचे महत्त्व अबाधित राखून, तिचे पावित्र्य कायम ठेवूनच त्या मंदिराचा जीर्णोद्धार होतो.
एके काळी पंढरपूरच्या वाळवंटातून नदी ओलांडू नये, असं म्हणत होते… त्या नदीवर जेव्हा पहिला रेल्वे ब्रिज बांधला गेला त्या इंग्रजांच्या काळातदेखील त्याला विरोध झाला आणि २००४ मध्ये पहिला १०१ कोटींच्या आराखड्यातून जो ब्रिज बांधला गेला तेव्हाही विरोध झाला. विरोध ही समाजाची एक भावना आहे, त्याची दखल घेतली पाहिजे, परंतु कधी कधी त्या विरोधाच्या पाठीमागची कारणे आणि त्या निर्मितीच्या पाठीमागची कारणे याची मीमांसा करण्याची जरुरी आहे. नदी ओलांडू नये, ही श्रद्धा होती. पण आज नदी ओलांडायचीच नाही ठरवले तर प्रगतीचे आणि विकासाचे अनेक मार्गदेखील बंद होतील, ही वस्तुस्थिती आहे. जर तो बंधारा आणि फुल उभारला नसता तर लाखो वारकऱ्यांची येणारी-जाणारी सोयदेखील तिथे थांबली असती.
मंदिरांचे जीर्णोद्धार झाले नसते तर मंदिरांची पडझड झाली असती आणि मंदिर नामशेष झाले असते. इतिहासामध्ये मंदिर नामशेष होण्याची कारणे त्यावेळी हल्ले हे आहे. ती पडून जमीनदोस्त झाली. याची कारणे सापडत नाहीत. कारण वेळोवेळी राजांपासून ते आताच्या धार्मिक नेतृत्वापर्यंत अनेकांनी अनेक प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. सदाशिव पेठेतल्या ८० उलटलेल्या आजी-आजोबांनादेखील आपल्या वाड्यावरची आणि त्याला असलेल्या खंडा-दंडावर प्रेम असतंच, परंतु त्याचा योग्य वेळी पुनर्निर्माण केले नाही तेथे स्लॅबची सोसायटी उभी केली नाही तर हीच खंड-दंड आपल्या नातवांचा काळ म्हणून खाली येतील, याचीदेखील जाणीव त्यांना आहे.
मनमोहन सिंग यांच्या अंगचे कॅमेरे हे खडकवासला रोडच्या झपूर्झा मध्ये ठेवले आहेत. रंगभूमीचा आणि चित्रपटांचा सुवर्णकाळ दाखवणारे ते सर्व साहित्य आहे, पण त्यालाच कवटाळून बसलो का आपण. 3d 4d कॅमेरे आले. माहिती तंत्रज्ञान स्वीकारलेदेखील. महाराष्ट्रामध्ये टुरिंग टॉकीज ही संस्कृती होती, नव्हे तर ते अनेक कलाकारांची बारा बलुतेदारांची अर्थवाहिनी होती. गावोगावी फिरायचे आणि तेथील सर्वांना रोजगार मिळायचा.
पण टुरिंग टॉकीज गेले, व्हिडीओ क्लब आले. व्हिडीओ क्लब गेले थिएटर झाले आता थिएटर गेल्याने मल्टिप्लेक्स आले. सातत्याने नवनिर्मिती सृजनता आणि अधिक सुविधा पूर्ण विकासाकडे मानव जातीची वाटचाल असतेच आणि ती अविरत सुरू राहिली पाहिजे. वाड्या बसताना जोडणारी रस्त्यांची वारंवार दुरुस्ती होऊन देखील वर्षानुवर्षे तसेच राहिले आणि आपणही पुण्याहून पंढरपूरला जाताना किंवा पुण्याहून औरंगाबादला जाताना दहा दहा तासांचा प्रवास अनुभवला आहे. सुवर्ण समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अफलातून परिवर्तन झाले आणि ही सगळी परिस्थिती बदलली.
पुणे, मुंबई देखील पाच तास होते तेदेखील आज अडीच तासात आली त्यावेळीदेखील निसर्गसंपन्न असलेल्या सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यातून हे सिमेंटचे रस्त्यांचे जंगल यांचे जाळं वाढू देऊ नका म्हणून अाक्रांत चालविलाच होता. पण तो निसर्ग अबाधित ठेवून नितीन गडकरी यांनी कल्पकतेने हे रस्ते रचले आणि आज त्याच रस्त्यांवरून सह्याद्रीच्या त्या सौंदर्याच्या अधिक जवळ आपल्याला जाता आले प्रत्येक ठिकाणी विरोध हा गरजेचाच नसतो, किंबहुना महत्त्वाचा देखील नसतो. हा जरूर ती समाजाची एक भावना आहे, पण त्या भावनेच्या पुढे देखील व्यवहार म्हणून आपण काही गोष्टींकडे बघायला शिकले पाहिजे.
पन्नास वर्षांपूर्वीची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये जमीनआसमानाचा फरक आहे. पु. ल. देशपांडे यांच्या कल्पकतेबद्दल कोणाच्याही मनात संधी नाही. त्याकाळी त्यांनी जे पाहिले ते अनेक वास्तुविशारदांपेक्षाही भव्यदिव्य होते आणि खरोखरच बालगंधर्वची आजची जी बांधणी आहे तीदेखील सुयोग्य आहे परंतु ८४ सालात पुलंनी पाहिलेले पुणे ते १४ लाखाचे होते आजचे ४४ लाखांवर गेले आहेत.
आज एखाद्या नाटक बालगंधर्व सुरू असेल आणि ५० जरी प्रेक्षक असले तरी वाटपाच्या तारखांमध्ये प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची गोष्ट सारख्या नाटकाला प्रतीक्षा करावी लागते. त्याला लवकर प्रेक्षागृह मिळत नाही आणि रसिकांनाही ते नाटक तोपर्यंत दुरापास्त होते त्यापेक्षा लहान लहान अासनांचे जर काही नाट्यगृहे उभारली गेली तर एकाच वेळी प्रायोगिक रंगभूमीपासून व्यावसायिक नाटकांपर्यंत प्रयोग तेथे होऊ शकतील आणि ही काळाची गरज आहे.
एका कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना घेऊन कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गेलो. सध्या गोखले साहेबांना पायाचा त्रास होत आहे, पण त्यांना १३ पायऱ्या सोडून वरती जावे लागले, त्या सभागृहात पोहोचवण्यापर्यंत जेष्ठ कलाकारांना सहज सुलभतेने जाताही येऊ नये तीच अवस्था बालगंधर्वती देखील आहे त्यापेक्षा आपोआप सरकते जाणारे जिने लिफ्ट अशा अनेक अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे नाट्यगृहांची उभारणी केली तरी लहानसहान त्रास देखील आपण वाचवू शकतो. भव्य पार्किंग तळासहित सुमारे तीन लाख स्क्वेअर फुटाचा परिसर त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. अनेक नाट्यगृहे कलादालने संस्कृतीची प्राचीन पुण्याची सौंदर्यस्थळे दाखवणारे अनेक दालने तेथे अस्तित्वात आणण्याची योजना आहे त्यामुळे विरोधाच्या भावनेपेक्षा देखील आपली सुविधा पुढे होते का याचाही विचार पुणेकरांनी करायला हवा.
याच कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मुख्य मुद्दा मांडलेला असा की राजकारणाचे ट्रॅक रेकॉर्ड खराब असल्यामुळे जे नवनिर्माण होणार ते योग्य होणार नाही असा आमचा विश्वास आहे पण यावरही माझा आक्षेप आहे त्यांचे ट्रॅक्टर जरूर खराब असेल कुठल्या राजकारणाचे ट्रॅक रेकॉर्ड खराब नसते भारतीय लोकशाहीमध्ये मतदानानंतर दिलेले अपरिमित अधिकाराने राजकारणांनी अनेकदा हानीच केली आहे परंतु त्यातही जे चांगले झाले ते देखील या राजकीय नेतृत्वांच्या निर्णयामुळे झाले आहे हे विसरता येणार नाही.
उद्याची उजळणारी पहाट ही काळीज पहाट आहे, इतकी नकारात्मकता आपल्यामध्ये का यावी ? मग बालगंधर्व रंगमंदिर पाडू नये पुनर्विवाह होऊ नये याकरिता आपण जो दबाव गट निर्माण करत आहोत त्यापेक्षा हा दबाव त्याच्या पूर्ण निर्माणमध्ये सकारात्मकता यावी, पारदर्शकता यावी पृथ्वीची प्रतीक उभा राहून त्याचे व्यावसायिकरण न होता ठेकेदारांचा हित न जोपासता सामान्य रसिकांच्या हित डोळ्यासमोर ठेवूनच तो पुन्हा निर्माण व्हावा यासाठी आपण दबाव निर्माण करू नये. बरं याच व्यासपीठावर मान्यवराने सांगितले की, आपण किती ओरडलं तरी ते होणारच आहे.
म्हणजे तुम्ही आधीच पराभूत मानसिक येत आहात. तरीही पुन्हा त्या प्रवाहात विरोधाच्या प्रवाहात सामील होत आहात, हे नेमकं काय आहे. जर होणारच आहे तर ते चांगलं कसं होईल यावर आपण आपले बळ का लावू नये कुठल्याही मान्यवराचा अवमान करण्याची भावना नाही. पण कधीकधी आपण निवडलेला विरोधी प्रवाहाचा मार्ग सत्याचा आणि अधिक लोकव्यापक हिताचा असेल तर स्वीकारायला काय हरकत आहे.
रंगमंदिराचे पुन्हा निर्माण होऊ नये, या भूमिकेवर मान्यवरांकरता या कार्यक्रमात अनेक टाळ्या पडल्या पण त्यानंतर मी मांडलेल्या भूमिकेवर टाळ्या वाजवणे हे पुणेकरांना कदाचित संकुचित वाटले असावे. दहा मिनिटापूर्वीच आपण एका प्रवाहाला दाद दिली आणि दहा मिनिटाच्या अंतरानंतर एका भूमिकेला आपण टाळी वाजवून समर्थन देऊ शकत नाही, ही त्यांची अडचण मी समजू शकतो. पण या सगळ्या परीक्षागृहात एका व्यक्तीने मात्र जरूर टाळी वाजवली. गर्दीतला चेहरा होण्यापेक्षा प्रवाहाच्या विरोधात उभे राहू इच्छिणाऱ्या त्या व्यक्तीच्या हिमतीची दाद द्यायला हवी.