दोषी ऋषभ पंतला मिळाली ‘ही’ शिक्षा…
मुंबई : दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर काल खेळला गेलेल्या सामना. कर्णधार ऋषभ पंतला सामन्यादरम्यान केलेल्या वागणुकीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयपीएल नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंत दोषी आढळला असून. पंतला मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. पंतने लेव्हल- 2 चा गुन्हा मान्य केला आहे. दिल्लीचा कर्णधार कलम 2.7 मध्ये दोषी आढळला असून. दिल्ली कॅपिटल्स शार्दुल ठाकूरला सामन्याच्या टक्केवारीच्या 50% दंड ठोठावण्यात आला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनाही त्यांच्या मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला. यासोबतच त्यांच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली आहे. अमरे यांच्यावर कलम 2 आणि 2.2 चे उल्लंघन केल्याचा आरोप होता जो त्यांनी मान्य केला
सामन्याचे शेवटचे ओव्हर करत असलेल्या ओबेड मैकॉयच्या तिसऱ्या चेंडूला अंपायरने ‘नो-बॉल’ दिला नाही. तर पंतसह संपूर्ण कॅम्पला तो नो-बॉल वाटत होता. यानंतर पंतने सहायक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना मैदानात पाठवले. प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी ‘नो-बॉल’ तपासणीसाठी इशारा केला, ज्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला. पंतने आपली चूक मान्य केली आणि म्हणाला- मला वाटते की तो संपूर्ण सामन्यात चांगली गोलंदाजी करत होता, पण शेवटी आम्हाला संधी दिली. मला वाटले की नो बॉल आमच्यासाठी मौल्यवान असू शकतो. निराश झालो पण त्याबद्दल फार काही करू शकत नाही.