… यामुळे राणा-राऊत या दोन राजकीय कट्टर विरोधकांमध्ये रंगल्या गप्पा

मुंबई : भारतीय संसदेतील परराष्ट्र व्यवहार समितीकडून लेहमध्ये अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विरोधकांवर सतत तुटून पडणारे संजय राऊत आणि सत्ताधाऱ्यांवर नेहमी टीका करणारे राणा दाम्पत्य सध्या एकाचवेळी लेह दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे काही व्हिडिओ सोशल मिडीया समोर आले असून, एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले संजय राऊत आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये चांगल्या गप्पागोष्टी रंगल्याचे पाहायला दिसत आहे. विशेष म्हणजे राणा आणि संजय राऊत एकाच पंगतीत बसलेले दिसतात.
दरम्यान, राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तक्रार करण्यासाठी थेट दिल्ली गाठली होती. त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना भेटून आम्हाला तुरुंगात वाईट वागणूक दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र संसदीय समितीच्या अभ्यास दौऱ्यासाठी राणा दाम्पत्य लेहकडे रवाना झाले. विशेष म्हणजे या दौऱ्यात खासदार संजय राऊत देखील आहे. या वादाचा परिणाम लेह दौऱ्यावर होणार का? असा प्रश्न होता. तसेच दोघंही एकमेकांसोबत चर्चा करताना देखील दिसत आहेत.