क्रिकेटवर आधारित ‘हे’ चित्रपट ठरलेत सुपरहिट, प्रत्येकाने एकदा तरी पाहिलेच पाहिजेत
आत्तापर्यंत आपण कॉमेडी, अॅक्शन, ड्राम, हॉरर, रोमँटिक, थ्रीलर अशा अनेक गोष्टींशी निगडीत चित्रपट पाहीले आहेत. पण बॉलिवूड फक्त लव्ह स्टोरी, अॅक्शन, कॉमेडी यावरच बेतलेलं नाहीये. कारण या गोष्टींसोबतच बॉलिवूडचा क्रिकेटशीही मोठ्या प्रमाणात संबंध आहे. त्यामुळे बॉलिवूडवाल्यांनी क्रिकेटवर आधारित काही चित्रपट काढले जे चांगलेच सुपरहिट ठरले. याचं कारण प्रेक्षक तर आहेतच पण सोबत क्रिकेट प्रेमींमुळे या चित्रपटांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. तर आता आपण क्रिकेटवर आधारित असणाऱ्या या चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत, जे प्रत्येकाने एकदा तरी पाहिलेच पाहिजेत.
1. लगान (Lagaan) – अभिनेता आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. क्रिकेटवर आधारित असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. या चित्रपटातील ‘तीन गुणा लगान देना पडेगा’ हा डायलॉग चांगलाच फेमस झाला होता. तसंच या चित्रपटात झालेली क्रिकेटची मॅचही चांगलीच रंगतदार होती. आमिर खान ब्रिटीश अधिकाऱ्यांशी क्रिकेट खेळण्याबाबत आव्हान स्विकारतो आणि ती मॅच चांगलीच रंगते. या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस पडलं होतं. प्रेक्षक आजही तो चित्रपट तितक्याच आवडीनं पाहतात.
2. काई पो चे (Kai Po Che) – ‘काई पो चे’ हा क्रिकेटवर आधारित असणारा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात तीन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना स्वत:चे स्पोर्टस शॉप आणि स्पोर्टस अकादमी उघडायची असते. पण राजकारण आणि जातीय द्वेषामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, ते त्यावर कसे मात करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं. तसंच या कथेच्या पार्श्वभूमीला क्रिकेट आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.
3. इक्बाल (Iqbal) – ‘इक्बाल’ हा क्रिकेटवर आधारित असलेला चित्रपट प्रत्येकानं एकदा तरी पाहिलाच पाहिजे. या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि नसीरूद्दीन शाह हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात एक मूक आणि कर्णधार मुलगा कशा पद्धतीने अडचणींवर मात करत क्रिकेटर बनतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरतं. तसंच या चित्रपटाचं कथानक उत्तम असून या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.