ताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेता पुष्कर जोगच्या आईविरोधात गुन्हा दाखल; शिक्षण क्षेत्रात कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप

मुंबई | मराठी अभिनेता (Marathi Actor) पुष्कर जोग (Pushkar Jog) याची आई आणि जोग एज्युकेशन ट्रस्टच्या (Jog Education Trust) संचालिका सुरेखा जोग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेखा जोग (Surekha Jog) यांनी शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालविल्या जाणाऱ्या ११ शाळांची बनावट कागदपत्रे तयार करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी सुरेखा जोग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२ या तीन वर्षांच्या कालवधी दरम्यान जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालवल्या जाणाऱ्या ११ शाळांचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. यानंतर शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थांच्या शुल्काचा परतावा शिक्षण विभागाकडून लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षांसह तत्कालीन उपशिक्षणाधिकारी आणि चौघावर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग, तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार, वरिष्ठ सहाय्यक गौतम शंकर शेवडे, हेमंत सावळकर या चौघांवर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात भादवी ४२०, ४६४, ४६५, ४६६, ४६८, ४७०, ४७१, २०१ आणि १२० ब ३४ या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये