भाजप खासदाराचा अजब दावा! कोणत्याही पक्षाला मत द्या, जिंकेल तर कमळच; नव्या वादाला तोंड

हैद्राबाद : (D. Arvind On Lok Sabha Election) आगामी लोकसभा निवडणुकांपुर्वीच भाजप खासदाराने अजब व्यक्तव्य केलं त्यामुळे देशाच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. सध्या देशातील सर्वाच राजकिय पक्ष लोकसभेच्या तयारीला लागला आहे. भाजप खासदार डी. अरविंद यांनी म्हटलं की, कोणालाही मत द्या, पण ते मत भाजपलाच मिळेल, त्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
भाजप खासदाराच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) आक्षेप घेतला असून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. बीआरएसने ईव्हीएम मशिनवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. बीआरएसने अरविंद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बीआरएस पक्षाच्या नेत्यांनी तक्रार दाखल करत म्हटलंय की, ‘अरविंद यांचा इरादा स्पष्ट होत आहे. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर बटन दाबले तर भाजपला मतदान जाईल. ईव्हीएममधील घोटाळ्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणात गंभीरतेने चौकशी व्हायला हवी,’ अशी मागणी केली आहे.