कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सुटला? डी के शिवकुमार म्हणाले, मी पक्षासाठी अनेकदा त्याग केला अन्…”

बंगळुरू : (D K Shivkumar On Siddaramaiah) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार ही दोन्ही नावं मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ मानली जात आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच होणार अशी चर्चा सुरु आहे. अशातच …डी के शिवकुमार यांनी स्वतः यासंदर्भात संकेत दिल असल्याचे बोलले जात आहे.
डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून तणावाचे संबंध असल्याची चर्चा आहे. अशातच डी के शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही लोक म्हणतात की, माझे सिद्धरामय्या यांच्याशी मतभेद आहेत. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मी पक्षासाठी अनेक त्याग केले आहेत आणि सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. मी सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला आहे. अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच होणार याचे संकेतही शिवकुमार यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. त्याच्या खूप पुढे जात 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे, तर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारलं आहे. भाजपची 104 जागांवरून 65 जागांवर घसरगुंडी झाली आहे.