क्राईमदेश - विदेश

बापरे! …पैसे मोजता मोजता मशीनही थकलं?

रांची : सक्तवसुली संचालनालयनं (ईडी) शुक्रवारी झारखंडच्या सचिव पूजा सिंघल यांच्यासह अनेक जणांवर कारवाई केली. ईडीनं त्यांच्या जवळच्या सहायकाकडून जवळपास १९ कोटी रुपये जप्त केले आहेत. पूजा यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट सुमन कुमार यांच्याकडून जप्त केले असून १.८ कोटी रुपये इतर ठिकाणाहून जप्त करण्यात आले आहेत. हे एवढे पैसे मोजता-मोजता अक्षरशा मशीनही बंद पडलं?

पूजा सिंघल २००० बॅचच्या झारखंड कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. सिंघल यांनी मागच्या भाजपा सरकारमध्ये कृषी सचिवपासून सध्याच्या सरकारमध्ये पर्यटन आणि उद्योग सचिव अशा अनेक प्रमुख पदांवर काम केलं आहे. त्यांचे पती अभिषेक झा पल्स संजीवनी हेल्थकेअर प्रायव्हेट हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांनी देशातल्या सर्वात प्रतिष्ठित अशा UPSC परीक्षेत यश मिळवल्याने त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. पूजा सिंघल यांचं पहिलं लग्न प्रशासकीय सेवेतच असलेल्या राहुल पुरवार यांच्याशी झालं होतं. पण लवकरच त्या दोघांत वाद सुरू झाले आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सिंघल यांनी अभिषेक झा यांच्याशी लग्न केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये