राष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

दगडूशेठ गणपती मंदिर व शनिवारवाडा सुरक्षित?

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि शनिवारवाड्याच्या सुरक्षितेबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. या प्रसिद्ध ठिकाणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात त्रुटी आढळल्या आहेत. गर्दीची ठिकाणं असल्याने या ठिकाणी घातपाताची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहेत. पोलिसांकडून महापालिका आयुक्तांना अहवाल देण्यात आला आहे.

अनधिकृत दुकाने आणि परिसरात कचरा : गणेशोत्सवादरम्यान शनिवारवाडा बाहेरील बाजूला अनाधिकृत दुकाने उघडण्यात येतात. शिवाजी मार्ग या रस्त्यावर पत्रा शेड आणि मोठ्या प्रमाणात मंडपं लावून दुकाने उभारली जातात. गणेशोत्सवानंतर शनिवारवाडाच्या परिसरात कचरा टाकला जातो त्यामुळे तेथे दुर्गंधी होते. तसेच इतर दिवशी देखील दुकान लावली जातात. शनिवारवाडाच्या बाहेरील परिसरात दुकानदार कचरादेखील टाकतात. त्यामुळे अशा दुकानांना परवानगी देऊ नका, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.

शनिवारवाडा हे एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आणि ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिपत्याखाली येते. देश-विदेशातील पर्यटक शनिवारवाडा पाहण्यासाठी येत असतात. ४ एप्रिल २०२२ या दिवशी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलीस यंत्रणा यांनी सर्वे केला होता. शनिवारवाडाच्या परिसराची पाहणी केली असता त्यांना काही त्रुटी जाणवल्या होती.

याकरिता शनिवारवाडाच्या सुरक्षिततेबाबत भारतीय पुरातत्व विभागाने पत्र देखील लिहिले आहे.  गणेशोत्सवा दरम्यान तसेच इतर दिवशी शनिवारवाडा बाहेरील परिसरात अनाधिकृत दुकाने लावण्यास परवानगी देऊ नका, असे पत्र देखील पुरातत्व विभागाने महापालिका आयुक्तांना दिले.

पुण्यातील इतिहासकालीन वास्तू जपण्यासाठी काही ठोस उपाययोजना कायमस्वरुपी असणे गरजेचे आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुण्याची श्रद्धेचे स्थान आहे. सण-उत्सवाच्या वेळी मंदिरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात असणे आवश्यक आहे. सुरक्षा तपासणी किंवा खाजगी सुरक्षा रक्षक आणि आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची नियमितपणे तपासणी, अग्निशमन संबंधित उपकरणे वाढवणंे आवश्यक आहे.

इलेक्ट्रिकल ऑडिट करणे देखील महत्वाचे आहे.नियमित सुरक्षिततेसाठी आणि कोणत्याही अत्यावश्यकतेसाठी एक नियमावली तयार करणे आवश्यक असून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. प्रसिद्ध ठिकाणच्या सुरक्षेबाबत तपास यंत्रणांना त्रुटी आढळल्या असतील तर याकडे विशेष लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये