ताज्या बातम्यामनोरंजन

‘डाॅन 3’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस? निर्मात्यांनी केला खुलासा; म्हणाले, “लवकरच…”

मुंबई | Don 3 – बाॅलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटानं बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत दमदार कमाई केली आहे. या चित्रपटामुळे शाहरूख खान चांगलाच चर्चेत आला होता. तसंच आता त्याचा ‘डाॅन 3’ (Don 3) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 2006 साली ‘डाॅन’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबतची माहिती निर्माते रितेश सिधवानी यांनी दिली आहे.

रितेश सिधवानी म्हणाले की, “माझा मित्र फरहान अख्तर डॉन-3 चित्रपटाचे स्क्रिप्ट लेखन पूर्ण करीत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही. सध्या तो चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.”

दरम्यान, 2006 साली डॉन चित्रपटाचा पहिला रिमेक प्रदर्शित झाला होता. यामध्ये शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होते. त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तसंच 2011 मध्ये डॉन-2 प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये