इतरक्राईमताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

“खंडणी द्या नाहीतर…”, वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

पुणे | Vasant More – मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बनावट मॅरेज सर्टिफिकेट बनवून 30 लाखांची खंडणी काही अज्ञातांनी मागितली आहे. खंडणी न दिल्यास गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच वसंत मोरेंच्या मुलाला धमकी आल्यानं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

अज्ञातांनी वसंत मोरेंचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) यांचं बनावट मॅरेज सर्टिफिकेट तयार करत त्यांना खंडणीची मागणी केली आहे. रुपेश मोरेंना अल्पिया शेख या महिलेच्या नावानं व्हॉट्सअप मेसेज करत 30 लाख रुपयाची खंडणी मागितली आहे. तसंच हे पैसे पुण्यातील खराडी येथील युवान आयटी थांबलेल्या इनोवा कारमध्ये ठेवा, असा मेसेज व्हॉट्सअपवर आला आहे. सोबतच मॅरज सर्टीफिकेट व्हायरल करण्याची धमकीही दिली आहे. खंडणी जर दिली नाही तर गोळ्या घालण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीनं तपास सुरु केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वडगाव गावाच्या ग्रामसेवकाच्या सहीचं मॅरेज सर्टिफिकेट असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आता पुणे आणि औरंगाबादमध्ये तपास होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रुपेश यांना सावध रहा अशी धमकी आली होती. रुपेश यांच्या गाडीवर एक धमकीची चिठ्ठी ठेवण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कात्रज परिसरात भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात रुपेश यांनी त्यांची गाडी शाळेच्या मैदानात लावली होती. त्यावेळी कोणीतरी त्यांच्या गाडीच्या वायपरमध्ये “सावध रहा रुपेश” आशी चिठ्ठी लावून ठेवली होती. रात्री घरी आल्यानंतर वसंत मोरे यांनी ती पाहिली होती. तसंच या घडलेल्या प्रकारासंर्भात वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये