आरोग्यइतरक्राईमताज्या बातम्यादेश - विदेशपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

दीनानाथ रुग्णालयाच्या अडचणींत वाढ

२० टक्के नव्हे तर ६० टक्के खाटा राखीव

पुणे

गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अडचणीत सापडलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण रुग्णालयातल्या २० टक्के नव्हे तर ६० टक्के खाटा गरिबांसाठी राखीव होत्या, मात्र त्याचे पालन झाले नसल्याचे दिसून आले आहे. दीनानाथ मंगेशकर या ट्रस्टवर सुरुवातीला विभागीय आयुक्त ट्रस्टी होते. नंतर मात्र यातून विभागीय आयुक्तांना वगळण्यात आले. धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी राखीव खाटा उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक आहे. अलीकडील घटनांमुळे या नियमांचे पालन होत असल्याबाबत शंका निर्माण झाली आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, संबंधित अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला आहे.     

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, जे एक धर्मादाय संस्था म्हणून नोंदणीकृत आहे. त्याला गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ६० टक्के खाटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. धर्मादाय रुग्णालयांसाठी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ४१ क नुसार, धर्मादाय रुग्णालयांना खाटा राखीव ठेवण्यासाठी काही नियम आहेत.   

वार्षिक उत्पन्न १.६० लाखांपर्यंत असलेल्या रुग्णांसाठी मोफत उपचारासाठी १० टक्के खाटा राखीव. तर याच उत्पन्न गटातील रुग्णांसाठी सवलतीच्या दरात उपचारासाठी ५० टक्के खाटा राखीव असतील, असा नियम आहे. या नियमांचे पालन न केल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाऊ शकते.  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गर्भवती महिला तनिषा भिसे यांना तातडीच्या उपचारासाठी दाखल करून न घेतल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणामुळे रुग्णालयाच्या धर्मादाय स्वरूपावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सर्वच तपास अहवालात रुग्णालयावर ठपका

भिसे मृत्यू प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरील चौकशी समितीचे अहवाल प्राप्त झाले असून, त्या सर्वच अहवालात हॉस्पिटल वर दोषारोप ठेवण्यात आले आहे. माता मृत्यू सर्वेक्षण अहवाल जाहीर झाला असून त्याने रुग्णालयावर ठपका ठेवला आहे. यापूर्वी धर्मादाय आयुक्त आणि सरकार यांच्या तपास अहवालात देखील रुग्णालयाचा प्राथमिक दोष असल्याचे सांगण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Check Also
Close
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये