पन्नास खोके कोणी घेतले, दोन दिवसात सांगणार; शिंदे गटाचा ठाकरेंना इशारा!

मुंबई : (Deepak Kesarkar On Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह पक्षाविरोधात बंड पुकारलं. तेव्हापासून सुरु झालेला शिवसेना-शिंदे गटाली वाद काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही. उलट अंधेरी पुर्व पोटनिवडणूच्या निमित्ताने याचे तिव्र पडसाद दोन्ही बाजूने उमटताना दिसत आहेत. शुक्रवार दि. 14 रोजी भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल करायला आलेल्या शिंदे गटातील शिवसैनिकांच्या रोषाला समोरं जावं लागलं. यावेळी शिवसैनिकांकडून गद्दार पन्नास खोके एकदम ओके अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त करत दोन दिवसांत ‘कोण खोके घेतं’ याचा खुलासा करणार असल्याचा इशारा दिला. दिलीप लांडे आणि शिंदे गटातील नेत्यांना ‘गद्दार’, ‘खोकासून’, ‘५० खोके एकदम ओक्के’ वगैर बोललं जातं. यावरूनही दीपक केसरकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “येत्या दोन दिवसांत मी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर देणार आहे.
दसरा मेळाव्याप्रमाणेच ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरून ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष बघायला मिळतो आहे. त्यावरूनही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “हा सर्व प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे. प्रत्येक वेळी आमच्यावर सत्तेचा दुरुपयोग करतो, हे आरोप लावणं चुकीचं आहे. जर आता ठाण्यात दिवाळी पहाटचे दोन कार्यक्रम होत असतील, तर ते शांततेत पार पडायला हवे”, असे केसरकर म्हणाले.