ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार गटाला मोठा धक्का, दीपक साळुंखे पाटलांच्या हाती मशाल

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात अजित पावरांना (Ajit Pawar) मोठा धक्का बसला आहे. कारण सांगोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील (Deepak Salunkhe) यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती मशाल घेतली आहे. त्यामुळं आता दीपक साळुखे पाटलांना सांगोला विधानसभेची उमेदवारी मिळणार का? असा सवला उपस्थित केला जातोय. फक्त दीपक आबा यांच्या हाती मशाल दिली आहे. सांगोल्याचा आमदार गद्दार झाला पण तुम्ही माझ्यासोबत आहेत आणि शब्दाला जागाल असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरेंनी केलंय. 

आजपासून संपूर्ण मतदारसंघात मशाल पोचवा

दसऱ्यानंतर पहिल्यांदाच मी समोर आलो आहे. मधल्या काळत हॉस्पिटलची वारी केल्याचे उद्दव टाकरे म्हगणाले. आराम करायचा किती? हराम्यांना घालवायचं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.  मुहूर्त चांगला लागलाय. मशाल कशी पेटवायची आणि कोणाकोणाला चटके द्यायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. आजपासून संपूर्ण मतदारसंघात मशाल पोचवा असेही ठाकरे म्हणाले.

सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता 

सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापने सांगोल्याच्या जागेवर दावा केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हे या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळं जर महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे पाटील यांनी उमेदवारी मिळाली तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. बाबासाहेब देशमुख हे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये