क्रीडा
दिल्लीने ११ षटकांत केला पंजाबचा ‘खेळ खल्लास’
मुंबई : आयपीएलच्या ३२ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिट्ल्स या दोन संघांमध्ये लढत झाली. दिल्लीच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झालेली असतानाही त्यांनी पंजाबला ९ विकेट्स राखून सहज पराभूत केले. सामन्यात पंजाब संघ चांगली खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र पंजाबचा डाव ११५ धावांवर गुंडाळला.
प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिट्लसने अवघ्या ११ षटकांत सामन्यावर आपलं नाव कोरलं. पंजाबच्या एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. पंजाबचे सर्वच खेळाडू ठरावीक अंतरावर बाद होत गेले. वीस षटकांत पंजाबने फक्त ११५ धावा केल्या. सलामीला आलेला शिखर धवन अवघ्या धावांवर बाद झाला.