ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

राखीनं केली सलमानची पोलखोल! म्हणाली; ‘अरे ही तर आमची वहिनी’

मुंबई : (Rakhi Sawant On Salman Khan) मनोरंजन विश्वातच नव्हे तर बॉलीवूडमध्ये देखील राखीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राखीचं वागणं, बोलणं आणि तिचं भडकणं हे सारं काही तिच्या चाहत्यांना नवीन नाही. बिग बॉसचा टीआरपी जेव्हा कमी झाला होता तेव्हा त्या शो ला टीआरपी मिळवून दिला होता.

आज राखीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्याविषयीच्या वेगवेगळया गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. राखी आणि सलमानचं नातं हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे.

राखीला सलमानविषयी खूप आदर आहे. ती त्याला भाऊ मानते. तिच्याविषयी कुणी काही बोललं तर त्याविरोधात लढतेही. कंगनानं जेव्हा सलमानवर टीका केली होती तेव्हा राखी ही एकमेव सेलिब्रेटी होती जिनं सलमानच्या बाजुनं प्रतिक्रिया दिली होती. आताही राखीनं सलमानच्या बाबत एका वेगळया गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

 सलमाननं जाहीरपणे त्याविषयी कधीही वक्तव्य केले नाही. यासगळयात राखीची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यात राखीनं युलियाचा एक फोटो पाहून ही तर आमची वहिनी असे म्हणून सलमानचं सिक्रेट ओपन केलं आहे. राखीनं एक व्हिडिओ शेयर करत त्याला दिलेली कॅप्शन अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये