ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…त्यामुळे दादा तुम्ही मला आता ट्विटरवर फाॅलो करा”, देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला

मुंबई | Devendra Fadnavis On Ajit Pawar – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. आज अजितदादांनी अनेक गोष्टींची चर्चा केली. कोण मुख्यमंत्री झाले? कुठले मुख्यमंत्री झाले? असं अजितदादा म्हणाले. पण मला एका गोष्टीचं दु:ख वाटत आहे. संधी मिळाली असतानाही अजितदादांना शरद पवार यांनी मुख्यमंत्री केलं नाही. तुम्हाला 2004 मध्ये संधी होती. तुमचे जास्त लोकं निवडून आले होते. तुमच्या कराराप्रमाणे ज्याचे जास्त त्याचा मुख्यमंत्री होणार होता. पण तुम्हाला ती संधी मिळाली नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

“अजित पवारांचं भाषण नेहमीच रोखठोक असतं. पण, यंदा 100 टक्के भाषण अजित पवारांचं वाटत नव्हतं. 50 टक्के जयंत पाटील यांचं होतं. जयंत पाटील सभागृहात नसल्यानं अर्ध भाषण लिहून दिलं, असा भास तुमच्या भाषणातून होत होता. मी वीज तोडण्याचा जीआर ट्वीट देखील केला. फेसबुकवर टाकला आणि सगळ्यांना पाठवला देखील, तरीही तुम्हाला कसं काय सापडला नाही. त्यामुळे दादा तुम्ही मला आता ट्विटरवर फॉलो करा”, असा खोचक टोलाही फडणवीसांनी लगावला.

तुमच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. याबाबत अमृता वहिनींना सांगू का ? असा प्रश्न अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, एकदा अजितदादांनी सांगितलं की अमृताशी बोला. पण दादा हे बोलताना तुम्ही सुनेत्राताईंना विचारलं होतं का? असा प्रतिप्रश्नही देवेंद्र फडणवीसांनी विचारला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये