पाटलांच्या महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्याचं फडवीसांनी केलं समर्थन, तर शाईफेकीवर संतप्त, म्हणाले…

मुंबई : (Devendra Fadnavis On Chandrakant Patil) महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेबब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथिल भाषणात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट पसरलीय. चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी देखील तीव्र शब्दात आक्षेप घेतलाय. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून दिलगीरी देखील व्यक्त केली. परंतु, आज पिंपरी-चिंचवड येथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान ते म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. एखादा शब्द पकडून त्यांना टार्गेट करणं चुकीचं आहे. शिवाय चंद्रकांत पाटील यांनी माफी देखील मागितली आहे. माफीनंतर टार्गेट करणं चुकीचं आहे असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.
“चंद्रकांत पाटील यांच्या वाक्याचा आशय समजून घ्यायला पाहिजे. महापुरूषांच्या कामाबद्दल बोलताना त्यांच्या मनाचा मोठेपणा किती होता हे चंद्रकांत पाटील यांना सांगायचं होतं. परंतु, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला. शिवाय त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफी देखील मागीतली आहे. तरी देखील त्यांच्यावर शाई फेकण्यात आली, हे चुकीचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.