क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शरद पवारांना ठार मारण्‍याची धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता; बावनकुळे, दानवेंसोबतची छायाचित्रे समोर

अमरावती : (Devendra Fadnavis On Sharad Pawar) राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निगालं आहे. त्यांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर हा अमरावती येथिल भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने फेक ट्विटरवरून दाभोळकर करण्याची धमकी दिली.

दरम्यान, यामुळे आज दिवसभरात एकस आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. अमरावती येथील साईनगर भागात राहणारा 26 वर्षाचा सौरभ हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याने आय ॲम बीजेपी अक्टिव्हिस्ट आय हेट सेक्यूलेरिझम असं लिहून ठेवलं आहे. याबाबत अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सौरभ पिंपळकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्याचा सध्या सोध सूरु असून पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरी धडक मारली असता तो फरार असल्याचं आढळून आला आहे. त्याचा मोबाईलदेखील सध्या बंद आहे. सौरभ पिंपळकरचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतची काही छायाचित्रे आता समाज माध्‍यमावर प्रसारित होऊ लागली आहेत. त्यामुळे हे भाजपचे तर कटकारस्थान नाही ना? असा सवाल सर्वसामान्य नागरीकांकडून व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये