देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्टीकरण; म्हणाले…
नवी दिल्ली | Devendra Fadnavis Statement On Cabinet Expanssion – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून खडाजंगी बघायला मिळते आहे. याच दरम्यान आता अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो”, असं फडणवीस म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधक टीका करत आहेत. मात्र, विरोधकांना असं बोलावचं लागेल. कारण त्यांचं मंत्रिमंडळ पाच जणांचंच होतं. हेच पाच मंत्री 30 ते 32 दिवस सरकार चालवत होते. मात्र, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान, 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं वक्तव्य सुधीर मुंनगटीवर यांनी केलं होतं. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता, “त्यापूर्वीही मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो”, असंही फडणवीस म्हणाले.