माजी राष्ट्रपती प्रतिभाईताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत काळाच्या पडद्याआड, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे | Devi Singh Shekhawat Passes Away – भारताच्या पहिल्या माजी महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांचे पती देवीसिंह रणसिंह शेखावत (Devi Singh Shekhawat) यांचं आज (24 फेब्रुवारी) पुण्यात निधन (Devi Singh Shekhawat Passes Away) झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंह शेखावत यांचं पुण्यातील के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजारामुळं निधन झालं. तसंच त्यांच्या निधनानं सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी देवीसिंह शेखावत यांना हृदयविकाराचा धक्का आल्यानं पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं होतं. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. तसंच पुण्यात आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
देवीसिंह शेखावत यांनी अमरावतीचे माजी महापौर म्हणून काम केले होते. तसंच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य होते. ते विद्याभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्षही होते. डॉ. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभाताई पाटील यांनी 7 जुलै 1965 रोजी लग्नगाठ बांधली होती. ते अनेक दशके अमरावतीच्या राजकीय आणि शैक्षणिक वर्तूळात कार्यरत होते. तर गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्याला होते.