ताज्या बातम्या

“…आता इतिहासात लघुशंका करायला लागले”; धनंजय देसाईंचा अजित पवारांवर निशाणा

पुणे | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानानंतर राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याच दरम्यान आज पुण्यात लाल महाल ते डेक्कन छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई, आमदार शिवेंद्र राजे भोसले, आमदार भीमराव तापकीर,तेलंगणाचे आमदार राजा भैया ठाकूर, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी अजित पवार यांच्या विधानावर चांगलेच उत्तर दिले आहे.

यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई म्हणाले, संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते म्हणणारे शाहिस्तेखान,अफजलखान यांच्या कुळातलेच असावे. धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले. कदाचित तुम्ही पवार नसाल, पण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते. अशा शब्दात हिंदू राष्ट्रसेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये