अर्थइतरताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रस्मार्ट उद्योजक

धर्माबादच्या मिरचीचे दर घसरले

नांदेड : नांदेडच्या धर्माबादच्या लाल मिरचीला देश विदेशात मोठी मागणी असते. हि लाल मिरची व त्याची पावडर चांगली टिकून राहत असल्याने या मिरचीला अधिक मागणी असते. मात्र देश- विदेशात मागणी होत असलेल्या धर्माबादच्या मिरचीचे भाव कमी झाले आहेत. बांग्लादेशातील परिस्थितीचा फटका या मिरची उद्दोगाला बसत आहे.

नांदेडच्या धर्माबाद येथील लाल मिरची ही देशातच नव्हे तर विदेशातही प्रसिध्द आहे. आखाती देशातही इथल्या मिरचीला मोठी मागणी आहे. धर्माबादची मिरची तिखट आणि चवीला उत्तम असल्याने या मिरचीला मोठी मागणी असते. परंतु सध्या मिरचीचे भाव गडगडले असून क्विंटल मागे पाच हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आणि  व्यापाऱ्यांना कोटींचा फटका बसत आहे. धर्माबाद येथे गावरान, ब्याडगी, काश्मिरी डब्बी, तेजा, जिटी, सी ५, २७३, सुपर टेन, अरमुर आणि वंडरहाट अश्या १० प्रकारची मिरची उपलब्ध असते. यातील तेजा ही सर्वात तिखट असते. तर काश्मिरी डबी ही कमी तिखट असते. धर्माबाद इथ १२ मिरची पावडर तयार करणारे कारखाने आहेत. यातून दोन हजार कामगारांना बारमाही रोजगार मिळतो. सध्या उत्पादन होत असून भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये