पुणेसिटी अपडेट्स

भाजपने जनतेची दिवाळी गोड केली का?

कैसे लगे अच्छे दिन : राष्ट्रवादी युवक काँगेसचा जनतेला सवाल

पुणे : शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करत युवक राष्ट्रवादीचे गिरीश गुरूनानी यांनी जनतेला दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतानाच जनतेला प्रश्नही विचारला आहे. “कैसे लगे अच्छे दिन, लौटा दो हमारे बुरे दिन” असे वाक्य असलेले बॅनरमुळे जनतेचे लक्ष वेधले. तसेच २०१४ व २०२२ च्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींचा तुलनात्मक तक्ता लावत युवक राष्ट्रवादीने केंद्रशासित भाजपा सरकारच्या आर्थिक धोरणांवर आघात केला आहे. याविषयी बोलताना युवक राष्ट्रवादीचे कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरूनानी म्हणाले, ‘केंद्रशासित भाजपा सरकारने खरंच जनतेची दिवाळी गोड केली आहे का? हे या किमतींकडे बघून जनतेनेच ठरवावे.
सामान्य जनतेवर होत असलेल्या महागाईच्या माऱ्याला केवळ केंद्रातील भाजपा सरकारच कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘आमदनी अठन्नी खर्चा रुपया’ हे वाक्य लििहलेले फलक हातात धरत त्यांनी गृहिणींनाही कोलमडत असलेल्या बजेटबद्दल प्रश्न केला आहे. GST च्या माऱ्याने बेजार झालेल्या व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडण्याचाही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुधाचे भाव २-२ रुपयाने वाढवत आता ५२₹ प्रती लिटरला पोचले आहेत.  आता सामान्य जनतेने स्वतः ठरवावे की त्यांना हा महागाईचा राक्षस डोक्यावर बसवून नाचायचे आहे की मग येत्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहन गुरूनानी यांनी केले.

या आशयाचे बॅनर शहरातील महत्वाचे भागात जसे चांदणी चौक, कोथरूड पेट्रोल पंप, नळ स्टॉप, डेक्कन पेट्रोल पंप, ज्ञानेश्वर पादुका चौक, बालगंधर्व, तसेच बिग बाजार आणि डी मार्ट बाहेरही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने झळकावण्यात आले आहेत. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये