उदा. वेअरेबल डिव्हाईसेस,सेन्सर्सचा वापर करून रूग्णांच्या हृदयाचा ठोका,साखरेची पातळी,रक्तदाबाची पातळीवर रिअल टाईम देखरेख ठेवता येईल आणि यासाठी क्लाऊडचा वापर करता येईल.५जी मध्ये मोठा माहितीसाठा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणावर पाठविण्याची क्षमता असल्याने हे कदाचित शक्य होईल.त्यामुळे दैनंदिन आरोग्यसेवा कामकाजात मोठा बदल घडू शकतो.
आरोग्यसेवा क्षेत्राच्या साखळीमध्ये पुरवठादार,रूग्ण,आरोग्यसेवा कर्मचारी,औषधनिर्माण कंपन्या अशा अनेक घटकांचा समावेश असतो.या सर्वांवर याचा सकारात्मक परिणाम होईल,यांत शंका नाही.
सायबर सिक्युरिटीच्या नव्या आव्हानांमुळे नव्या संधी
सायबर सुरक्षा हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर राहिला आहे आणि कुठलेही नवीन तंत्रज्ञान अंगीकृत करत असताना हा प्रश्न पुन्हा नव्याने उपस्थित होईल.कंपन्यांना आणि उपकरण उत्पादकांना याबाबत सतर्क आणि पूर्णपणे सज्ज राहण्याची गरज भासेल.यामुळे या क्षेत्रातील सेवा पुरवठादारांना नव्या संधी उपलब्ध होतील.
फाईव्ह जी – डिजिटल क्रांतीचे उत्प्रेरक
नव्या युगात टेलिकॉम हे सर्वात गतिशील क्षेत्र म्हणून प्रगती करत असून यातील सतत अद्ययावत होणार्या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रांमध्ये आमुलाग्र बदल होत आहे. फाईव्ह जी हे त्यापैकीच एक अद्ययावत तंत्रज्ञान असून त्यामुळे सुधारित कनेक्टिव्हिटी ही फक्त ग्राहकांना वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर, विविध औद्योगिक क्षेत्रांना देखील होणार आहे ज्यामुळे संपूर्ण डिजिटलायझेशन शक्य होईल.
वाढता ब्रॉडबँड व इतर इंटरनेटचा वापर,डाटाच्या वापरामध्ये होणारी आमुलाग्र वाढ,सरकारने डिजिटलायझेशनवर केंद्रित केलेले लक्ष्य,उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान अंगीकरणाचा कल या सर्व बाबींमुळे भारत हे डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि यामध्ये फाईव्ह जी चा मोठा वाटा असणार आहे.या क्रांतीमुळे विकासाच्या नवीन संधी,औद्योगिक उत्पादकतेमध्ये वाढ आणि सामाजिक-आर्थिक विकासाच्या चित्रामध्ये आमुलाग्र बदल शक्य होईल.
फाईव्ह जी तंत्रज्ञान सुरु झाले तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होणार आहे. दूरसंचार क्षेत्रात निर्माण होणार्या लाखो नोकर्या, उद्योजकतेच्या विकासामुळे निर्माण होणारी उत्पादन क्षमता,आंतर्देशीय आणि आंतररार्र्ष्टीय व्यवसायात होणारी वाढ अशा अनेक गोष्टींची भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूतीकरणासाठी हातभार लागेल. कदाचित त्यामुळेच की काय
डॉ. मिलिंद पांडे, प्र- कुलगुरू एमआयटी विश्वशांती विद्यापीठ
भारत हे डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर असून ५जी कार्यान्वित होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांनी याआधीच याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत, मोबाईल हँडसेट कंपन्या ५ जी साठी सज्ज झाल्या आहेत. खर्या अर्थाने भारतातील टेलिकॉम ग्राहक किंवा सर्वसामान्य नागरिक एका रंजक वळणावर आहेत.
सगळीकडून आपण ऐकत आहोत की, ५जी मुळे आमूलाग्र बदल घडणार आहेत. हे कशामुळे घडू शकते, यासाठी ४जी सेल्युलर नेटवर्क आणि ५जीमधला फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.
वेग
सर्वसामान्यांच्या दृष्टीने ४जी आणि ५जीमध्ये सर्वांत महत्त्वाचा काही फरक असेल तर तो आहे वेग. प्रत्येक सेल्युलर पिढी ही आधीच्या तंत्रज्ञान पिढीपेक्षा लक्षणीय वेगवान राहिली आहे. ४जीचा सध्याचा सर्वात उच्चतम वेग हा १०० एमबीपीएस आहे. खरेतर आपल्या सर्वांना अनुभव आला असेल, वास्तविकतेमध्ये सध्याच्या उपलब्ध पायाभूत सुविधांनुसार हा वेग ३५ एमबीपीएसच्या आसपास मिळतो. ५जीमध्ये ४जीपेक्षा १०० पट जास्त वेगाची क्षमता आहे. मात्र हा वेग लो बँड ५जी अथवा हायबँड ५जी यावर अवलंबून असेल.
लॅटनसी (विलंबता)
लॅटनसी म्हणजे कुठल्याही माहितीला दोन पॉईंट्सदरम्यान प्रवास करायला लागणारा वेळ. याचे मोजमाप लॅटनसीमध्ये केले जाते. आपल्याला नेहमी अनुभव येतो की, काही वेळेला डाटा ट्रान्सफर करायला वेळ लागतो. वेग कितीही असला तरी डाटा ट्रान्सफरला लागणार्या विलंबाच्याबाबतीत विचार केला जातो. ४जी नेटवर्कमध्ये हा विलंब किंवा लॅटनसी ५० मिलीसेकंदाची असून ५जीमध्ये यात आमूलाग्र सुधारणा १ मिलीसेकंदपर्यंत खाली येईल. कमी होणारा विलंब हा अनेक अॅप्लिकेशन्ससाठी महत्त्वाचा ठरेल आणि यामुळे डाटा प्रक्रियेसाठी क्लाऊडचा जास्त वापर होईल.
कव्हरेज/व्यापकता
४जी प्रस्थापित होऊन १ दशक झाले असले तरी अनेक दुर्गम भागात याची सेवा अजून अनेक वेळा विस्कळीत किंवा कमकुवत दिसते. ५जी आता सुरू होत आहे आणि त्यामुळे कदाचित काही मोजक्या प्रमुख शहरांच्या बाहेर याची व्यापकता वाढायला वेळ लागेल. दुर्गम भागांपर्यंत पोहोचायला आणखी वेळ लागू शकतो. त्याशिवाय पोहोचणारे नेटवर्क हाय, मीडियम किंवा लो बँड ५जी यावर आधारित असून प्रत्येक प्रकाराची स्वत:ची गती, क्षमता व व्यापकता असेल. याआधी अमेरिका आणि चीनमध्ये ५जी नेटवर्क कार्यान्वित झाले असले तरी तिथेही अजून हे नेटवर्क सर्वदूर पोहोचले नाही आणि सध्या शहरांपुरते
मर्यादित आहे.
बँडविड्थ (क्षमता)
५जीमध्ये ४जीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त क्षमता किंवा बँडविड्थ आहे. याचे एक कारण म्हणजे उपयुक्त स्पेक्ट्रमचा अधिक कार्यक्षम वापर ५जीमध्ये होणार आहे. ४जीमध्ये उपलब्ध स्पेक्ट्रमच्या थोड्याशा भागाचा वापर होतो, मात्र ५जीचे वर्गीकरण तीन बँड्समध्ये केले गेले आहे. प्रत्येकाची वेगवेगळी वारंवारता श्रेणी व गती असून ग्राहक, विविध व्यवसाय आणि उद्योग याचा भिन्न प्रकारे वापर करतील. याचाच अर्थ ५ मध्ये खूप जास्त क्षमता असेल.
भारत नेहमीच सर्वात जलदगतीने वाढणारी डिजिटल कन्झ्युमर बाजारपेठ होती. महामारीमुळे त्याला आणखी वेग आला आहे. महामारीच्या काळात लॉकडाऊनमुळे उद्योग व सर्वसामान्यांचे तंत्रज्ञानावरचे अवलंब कमालीचे वाढले आहे. भेटी-गाठीपासून ते खरेदी आणि व्यवहार हे सर्व ऑनलाईन होऊ लागले. त्यामुळे वेगवान आणि कार्यक्षम नेटवर्कची जगाला आणि भारताला गरज होती. ५जीमुळे भारतातील डिजिटल क्षेत्र पूर्णपणे बदलून जाईल यात शंका नाही. ५जीमधील क्षमता, वेग, कमी विलंबता यामुळे शिक्षण, आरोग्यसेवा, गेमिंग, मनोरंजन या क्षेत्रांवर मोठा प्रभाव पडला आहे.
भारत हे डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर असून ५-जी कार्यान्वित होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांनी याआधीच याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत, मोबाईल हँडसेट कंपन्या ५-जी साठी सज्ज झाल्या आहेत. खर्या अर्थाने भारतातील टेलिकॉम ग्राहक किंवा सर्वसामान्य नागरिक एका रंजक वळणावर आहेत.
सगळीकडून आपण ऐकत आहोत की, ५जी मुळे आमूलाग्र बदल घडणार आहेत. हे कशामुळे घडू शकते, यासाठी ४जी सेल्युलर नेटवर्क आणि ५जीमधला फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मोबाईल एंटरटेन्मेंट
मोबाईल एंटरटेन्मेंटचा विचार करता याचे वापरकर्ते प्रामुख्याने १८-५० वयोगटातील असतात.गेमिंग,चित्रपट,वेब सीरिज,सोशल मिडिया नेटवर्किंग,मोबाईलद्वारे पेमेंट,ऑनलाईन बुकींग प्लॅटफॉर्मस अशा अनके गोष्टींसाठी मोबाईल वापरला जातो.५जीमध्ये १० पट वेग असल्याने कंटेंट डाऊनलोड,डाटा ट्रान्सफर,लाईव्ह स्ट्रीमिंग यासारख्या महत्त्वाच्या अॅप्लिकेशन्समध्ये कमालीची सुलभता येणे अपेक्षित आहे,याला कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय),ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीची जोड मिळाल्यास एक वेगळाच अनुभव ग्राहकांना मिळेल.५जीच्या वेगाचा उपयोग फक्त या गोष्टींकरिता नाही तर उत्पादन क्षेत्र,लॉजिस्टिक्स,रिटेल यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होईल.
फाईव्ह जी चा होणारा प्रभाव
गेल्या काही वर्षात किफायतशीर ४जी इंटरनेटमुळे हाय स्पीड डाटाचा वापर वाढला असून फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे याला अधिक चालना मिळेल.फाईव्ह जी चा प्रभाव प्रत्येक उद्योगावर दिसून येईल.त्यामध्ये ऑटो,आरोग्यसेवा,उत्पादन निर्मिती,वितरण,आपातकालीन सेवा,शिक्षण यांसारख्या अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.संयुक्त राष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ४ मध्ये सर्वसमावेशक व समान गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांसाठी आयुष्यभर शिक्षणसंधी याचा समावेश आहे.सामाजिक विकासामध्ये शिक्षण हे सर्वांत मोठे आव्हान आहे.फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे अगदी दुर्गम भागातही सुधारित शिक्षण संधींचा लाभ सर्वांना मिळू शकेल.शिक्षणाला लागणारी जमीन,बांधकाम त्यापेक्षा अशा तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक जास्त होईल आणि त्याचा विद्यार्थांना लाभ होईल असा अंदाज आहे.फाईव्ह जी मध्ये असलेल्या जलद गतीमुळे विद्यार्थ्यांना रिअल टाईम क्लासेसचा लाभ घेता येईल.या सर्व गोष्टी जरी भविष्यातील स्वप्नासारख्या वाटत असल्या तरी फाईव्ह जी मुळे त्या वास्तविकतेत उतरायला वेळ लागणार नाही. शिक्षणाप्रमाणेच शेती,आरोग्य सेवा,दळणवळण,स्मार्ट सिटीज या क्षेत्रातही मोठा प्रभाव पडणार आहे.
५जी व आरोग्यसेवा
महामारीमुळे आरोग्यसेवा क्षेत्र हे केंद्रस्थानी आले आहे.महामारीच्या काळात जगातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडला होता.याचा प्रभाव फक्त कोविड रूग्णांवरच नव्हे तर नियमित उपचार लागणार्या रूग्णांवर देखील झाला.सर्व रूग्णालये भरून गेली होती.डॉक्टरांना भेटणे देखील अवघड झाले होते.अशा वेळेस रूग्णांच्या मदतीला धावून आले ते टेलिहेल्थ तंत्रज्ञान.हे तर एकच उदाहरण झाले,परंतु ५जी नेटवर्कमुळे आरोग्यसेवेच्या सर्व महत्त्वाच्या घटकांमध्ये परिवर्तन अपेक्षित आहे.त्यामध्ये टेलिहेल्थशिवाय मोठ्या मेडिकल फाईल्स किंवा माहितीसाठ्याचे ट्रान्सफर, उपकरणांद्वारे (वेअरेबल डिव्हाईसेस) रूग्णांचे रिअल टाईम मॉनिटरींग,उपचाराबाबत निरंतर माहिती व साहाय्य,रिमोट सर्जरी अशा अनेक पैलूंचा समावेश असेल.एका अर्थाने नवीन आरोग्य परिसंस्था तयार होईल.यामुळे आरोग्य सेवा क्षेत्रात अधिक कार्यक्षमता,सुलभता,व्यापकता आणि किफायतशीरपणा निर्माण होईल.आत्ताच्या काळात ४जी ब्रॉडबँड जरी उपलब्ध असले तरी त्याद्वारे फक्त डॉक्टरांच्या भेटी आणि त्यातून सल्ला व्हर्च्युअलरित्या होत आहेत.परंतु ५जी मुळे कदाचित आणखी मोठी उडी मारता येईल.