क्रीडा

शेर की झलग सबसे अलग! कार्तिकची तुफानी खेळी!

मुंबई – दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीने नांगी टाकली. त्यामुळे आजच्या करो या मरोच्या सामन्यामध्ये भारताची धावसंख्या कमी होणार असं वाटत होतं. मात्र दिनेश कार्तिकच्या तुफानी खेळीने भारताने दक्षिण आफ्रिकेला 170 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

कार्तिकने यावेळी 27 चेंडूंत 9 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 55 धावांची वादळी खेळी केली. त्यासोबतच हार्दिक पांड्यानेही 46 धावांची खेळी करत पडझड थांबवली. आज दोन्ही सलामीवीर फेल ठरले त्यासोबतच कर्णधार ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरही अपयशी ठरला.

दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी करिश्मा दाखवला आणि आफ्रिकेच्या संघाला 170 धावांच्या आतमध्ये रोखलं तर भारताचा विजय निश्चित आहे. मात्र आजच्या फलंदाजीने पुन्हा एकदा दिनेश कार्तिकने आपली संघातील जागा पक्की केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये