प्रशांत किशोर यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला अखेर पुर्णविराम…
नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीत. अशी माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत दिली आहे. किशोर यांनी काँग्रेसची ऑफर नाकारल्याने काॅंग्रेस तोंडावर अदळली आहे असे बोललं जातं आहे.
काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात चर्चेच्या तीन फेऱ्या पार पडल्या होत्या. यामध्ये किशोर यांनी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी काही गोष्टींचे सादरीकरणही केले. त्यानंतर किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तूळातून व्यक्त केली गेली. मात्र, आता सुरजेवाल यांच्या ट्वीटनंतर यावर पूर्ण विराम लागला असून, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर ट्वीट करत म्हणाले आहेत की. मी आयएजी चा भाग म्हणून काँग्रेस पक्षात सामील होण्यासाठी आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची ऑफर नाकारली आहे. तसेच परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.