CSK आणि जडेजामध्ये वाद वाढला ? संघाने केले इन्स्टाग्रामवरही अनफॉलो
नुकताच बरगडीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2022 च्या उर्वरीत हंगामातून बाहेर गेलेल्या जाडेजाला आता संघाने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने जाडेजा आणि सीएसकेमध्ये गंभीर वाद असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र CSK संघाचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी द इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
काशी विश्वनाथ म्हणाले की, “जाडेजा सीएसके संघात कायम राहणार आहे. मी सोशल मीडिया अधिक वापरत नसल्याने मला याबाबत अधिक माहिती नाही. मी इतकचं सांगेन की संघ व्यवस्थापन आणि जाडेजामध्ये कोणताच वाद नसून सोशल मीडियावर काय सुरु आहे, याबाबत मला जास्त माहिती नाही. पण भविष्याच जडेजा सीएसके संघातच असेल.”
RCB विरुद्ध सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती. त्यामुळं त्याला पुढच्या दिल्ली कॅपिटल्स वीरुषाच्या सामन्यालाही मुकावं लागलं.