दुर्दैवी घटना ! दापोली येथील भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यु…

दापोली : दापोली हर्णे मार्गांवरील आसूद जोशी आळी जवळील एका वळणावर दापोलीतून आंजर्ले कडे प्रवासी वाहतूक करणारी मँक्झिमो व दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत मँक्झिमो चालक अनिल (बॉबी) सारंग याच्यासह 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून यात 2 मुलांचा समावेश आहे. सर्व मृत प्रवासी पाजपंढरी जवळील अडखळ येथील आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवार दुपारी 2 वाजण्याचे सुमारास अनिल (बॉबी) हे त्यांची मँक्झिमो क्रमांक एम. एच.08.5208 हे दापोलीतून आंजर्लेकडे 14 प्रवासी घेऊन जात असताना त्यांची डमडम आसूद जोशी आळी नजीक असलेल्या वळणावर आली असताना समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरून टर्न मारल्याने मँक्झिमो ट्रकवर आदळली, ट्रॅकने डमडमला रस्त्याच्या डाव्या बाजूला घासत नेले, हा अपघात एवढा भयानक होता की मँक्झिमो मधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच दापोलीचे पोलिस निरीक्षक विवेक आहिरे यांनी पोलीस कर्मचारी व रुग्णवाहीका घेऊन अपघातस्थळी धाव घेतली. या अपघातात अनिल सारंग चालक वय 45 रा. हर्णे, संदेश कदम 55, स्वरा संदेश कदम-8, मारियम काझी – 6, फराह काझी, 27, शारय्या शिरगांवकर सर्व रा. अडखळ तर मीरा महेश बोरकर, वय 22, रा. पाडले,वंदना चोगले वय 34 रा. पाजपंढरी यांचा मृत्यू झाला आहे.
तर सपना संदेश कदम वय 34, रा. अडखळ, श्रद्धा संदेश कदम, वय 14, रा. अडखळ, विनायक आशा चोगले, रा. पाजपंढरी, भूमी सावंत वय 17, मुग्धा सावंत वय 14, ज्योती चोगले वय 9 रा. पाजपंढरी यांच्यावर उपजिल्हा व तर काही जखमींना मुंबई येथे हलविण्यात आले आहे.या प्रवासी गाडीत ऐकून 14 जण होते. अपघातानंतर ट्रक चालक फरारी झाला आहे.