आज ‘स्त्री कलासन्मान’चे वितरण

सन्मानार्थी नामवंत मान्यवर
रोहिणी निनावे, मंजिरी ओक, सोनिया परचुरे, शुभांगी दामले, मेघना एरंडे, हेमा लेले, सोनिया सहस्रबुद्धे, अनुराधा मराठे, मृदुल पटवर्धन, नीता प्रसाद लाड
पुणे : भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने यंदा प्रथमच श्रीकला सन्मान हा कार्यक्रम होणार असून, यामध्ये मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम करणाऱ्या नामवंत महिला कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचा सन्मान करण्यात येणार आहे .
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, खासदार गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या या सन्मान सोहळ्यासाठी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, ‘राष्ट्रसंचार’चे संपादक अनिरुद्ध बडवे आदी मान्यवर उपस्थित राहतील.
दैनिक राष्ट्रसंचार, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, न्यू समर्थ फॅशन डिलाईट एंटरटेन्मेंट हे या सन्मान सोहळ्याचे प्रायोजक आहेत. हा कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे शनिवारी दुपारी बारा वाजता होणार आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने आदिशक्तीच्या नऊ रूपांसमोर नतमस्तक होण्याचा आणि त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्याचा उत्सव असल्याची प्रतिक्रिया संयोजक माधुरी जोशी यांनी दिली त्यांनी सांगितले, की शहर आणि जिल्ह्यातील अशा नऊ सक्षम महिला कलाकारांचा सत्कार करण्याची संकल्पना या निमित्ताने आम्ही साकारत आहोत.