ताज्या बातम्यामनोरंजनरणधुमाळी

“सेल…सेल…सेल…एमएलए ले लो…”; ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचं ट्विट चांगलंच चर्चेत

मुंबई | Divyenndu Sharma’s Tweet Goes Viral – सध्या राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. महाविकासआघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे आहेत. एकीकडे राजकीय तर्कविर्तक लावले जात असताना दुसरीकडे अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यामध्ये आता मिर्झापूर फेम अभिनेता दिव्येंदु शर्मानं देखील महाराष्ट्रील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मजेशीर ट्विट केलं आहे.

दिव्येंदु शर्मानं आपल्या ट्विटमध्ये मजेदार अंदाजात लिहिलं आहे की, ‘सेल…सेल…सेल…एमएलए ले लो… या कथित नेत्यांसाठी राजकारण हा एक व्यवसाय झाला आहे.’ दिव्येंदुचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. तसंच त्याचं हे ट्विट १५ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे तर २ हजार पेक्षाही जास्त लोकांनी ते रिट्विट केलं आहे. याशिवाय अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

दरम्यान, दिव्येंदुच्या या ट्विटवर नेटकरी धम्माल प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरनं यावर कमेंट करताना लिहिलं, ‘अगदीच बरोबर आहे सर, मी याच्याशी सहमत आहे.’ तर दुसऱ्या एका युजरनं, ‘सत्य हे कंटाळेल पण कधीच हार मानणार नाही.’ अशी कमेंट केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये