महाराष्ट्ररणधुमाळी

“शरद पवार उद्या भाजपचं समर्थन करायला लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका”

अहमदनगर : Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar | सध्या राज्यात परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरील ईडी (ED) कारवाई नंतर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. तसंच यांनी मुख्यमंत्र्यांना आपला मुख्यमंत्री पदाचा दर्जा टिकवला पाहिजे असा सल्ला देखील दिला आहे.

विखे पाटील यांनी ईडी कौतुक करत नवाब मलिक प्रकरणाचं उदाहरण देत म्हणाले कि, ईडी पुराव्याशिवाय कोणतीच कारवाई करत नाही. याचबरोबर यांनी शरद पवार (Sharad Pawar ) याच्यावर देखील टीका केली की, २०१४ मध्ये मत मोजणी सुरु असताना राष्ट्रवादी पक्षाने भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांना भाजप जातीवादी वाटतं नव्हता. तसंच पवार हे उद्या भाजपचं देखील समर्थ करायला लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.त्यांनी अनेक वेळा आपल्या सोयीनुसार भूमिका बदलताना संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे. अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे.

याचबरोबर महाविकास आघाडी नव्हे तर महाभ्रष्टाचारी सरकार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यात सर्वत्र लूट सुरु आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. कोणीही जनतेचा अंत बघू नये नाहीतर सर्व भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवा. असा सल्ला देखील विखे पाटील यांनी मुख्यमंत्री यांना दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये