ताज्या बातम्यामनोरंजन

‘या’ तारखेला डाॅ. अमोल कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ होणार रिलिज!

नवी दिल्ली : (Dr. Amol Kolhe release new film shipratap garudzep) छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगाला दिशा देणारा आहे. जवळपास 450 पेक्षा जास्त वर्षापुर्वीच्या इतिहासाची सोनेरी अक्षरात लिहिलेली पानं आणि अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित प्रफुल्ल तावरे प्रस्तुत आणि डॉ. अमोल कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर राज्यात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने चित्रपटाच्या प्रमोशन करिता गरुडझेपच्या टीमने माध्यम प्रतिनिधींसह आग्रा भेट केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून तो आपल्या जीवनाशी जुळवून घेता आला पाहिजे, त्यातूनच इतिहासाचे स्मरण आणि आयुष्याची लढाई लढण्याची प्रेरणा मिळू शकते. या भावनेतूनच आग्रा भेटीचा हा अनुभव देण्याची संकल्पना अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि चित्रपटाच्या टीमने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये