पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

डॉ. कांकरिया यांना सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पुणे : शहरातील एशियन आय हॉस्पिटलचे संचालक आणि सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांना प्रतिष्ठित ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी इंटरनॅशनल अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा पुण्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. लॅसिक आणि मोतिबिंदू शस्त्रक्रिया या क्षेत्रातील नेत्रसंशोधनात त्यांच्या अनुकरणीय योगदानासाठी हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. डॉ. कांकरिया यांना नुकतेच एक्सपर्टस्केप या प्रतिष्ठित संस्थेने टॉप ५० ग्लोबल लॅसिक आणि मोतिबिंदू तज्ज्ञमध्ये समाविष्ट केले आहे. जे वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या कौशल्यानुसार आणि संशोधनातील योगदानानुसार श्रेणीबद्ध करते. ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीचे (एआयओएस) अध्यक्ष डॉ. ललित वर्मा यांच्या हस्ते नुकत्याच मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय वार्षिक परिषदेत आणि देश-विदेशातील ९००० हून अधिक नेत्र शल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये