ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

अन् शपथ घेताना राष्ट्रपती मुर्मू झाल्या भावूक!

नवी दिल्ली : (Draupadi Murmu oath as the President) देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून यांनी द्रौपदी मुर्मू यांनी सोमवार दि. 25 रोजी संसद भवनात शपथ घेतली. देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास त्यांनी रचला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्याकडून द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली गेली.यावेळी त्या पहिलं अभिभाषण करताना भावूक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो व पूर्णही करु शकतो अशी त्यांनी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.

यावेळी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रि परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती देखील आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला या अमृत अमृतोत्सव काळात वेगाने काम करावे लागेल. २६ जुलै हा कारगिल विजय दिवसही आहे. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. आज मी कारगिल विजय दिवसानिमित्त देशाच्या सैन्याला आणि देशातील सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा देतो.

ओडिशातील एका छोट्या आदिवासी गावातून मी माझा जीवन प्रवास सुरू केला. सुरुवातीचे शिक्षण घेणे हे माझ्यासाठी स्वप्नासारखे होते. पण अनेक अडथळे येऊनही माझा निश्चय पक्का राहिला आणि मी कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी ठरले. गरीब घरात जन्मलेली मुलगी, दुर्गम आदिवासी भागात जन्मलेली मुलगी भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचू शकते हे आपल्या लोकशाहीचे सामर्थ्य आहे. माझी निवड म्हणजे भारतातील गरीब लोक स्वप्न पाहू शकतात आणि ते प्रत्यक्षात आणू शकतात याचा पुरावा आहे. अशी भावना द्रौपदी मुर्मूंनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये