१०० हून अधिक चित्रांचे प्रदर्शन भरविणारी ‘दृश्या मालपाणी’

पुणे : विखे पाटील मेमोरियल स्कूलची दहावीची विद्यार्थिनी दृश्या मालपाणी तिचे पहिले एकल कला प्रदर्शन भरवत आहे. तिने गेल्या दोन वर्षांत बनवलेल्या १०० हून अधिक पेंटिंग्ज या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. दृश्याला आर्ट्समध्ये करिअर करायचे आहे.
मी एक स्वयंशिक्षित कलाकार आहे आणि कोणत्याही व्यावसायिक मदतीशिवाय मी ही चित्रे काढली आहेत. ही चित्रे अॅबस्ट्रॅक्ट, लँडस्केप पोर्ट्रेट इत्यादी विविध कलाप्रकारांत आहेत आणि जलरंग, अॅक्रेलिक आणि ऑइल पेंट्स यासारख्या विविध माध्यमांमधून साकारण्यात आली आहेत.
द़ृश्या मालपाणी
सध्या हे प्रदर्शन दर्पण आर्ट गॅलरी, पत्रकार नगर, सेनापती बापट रोड येथे भरविण्यात आले आहे. २१ ते २४ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीत सकाळी ११ ते संध्याकाळी ७:३० पर्यंत सर्वांसाठी खुली असेल आणि प्रवेश विनामूल्य आहे. तिच्या कलाकृतीसाठी तिचे पालक, शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला प्रोत्साहन दिले आहे.
दृश्या मालपाणी म्हणाली की, कुठलं चित्र कुठल्या आकारात व कुठल्या रंगसंगतीत उठून दिसेल, याचा विचार मी करते. बोट किंवा तळहाताचा उपयोग करून आकृती साकारण्यात मला मौज वाटते. जलरंग व रेखाचित्रांमध्ये तरबेज होऊ लागलेली दृश्या निसर्गाची विविध रूपं कागदावर उतरविण्यात विशेष रमते. एका चित्रात तान्हा गणपतीबाप्पा आईच्या कडेवर, तिच्या खांद्यावर मान टेकवून, तिला बिलगलेला दाखवला आहे.
नुकतीच दहावीत गेलेल्या, चौदा वर्षांच्या दृश्या मालपाणी या बालिकेच्या लोभस चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जलरंग व रेखाचित्रांमध्ये तरबेज होऊ लागलेली दृश्या निसर्गाची विविध रूपं कागदावर उतरविण्यात विशेष रमते. त्यातही तिला वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करायला आवडत असल्याचे सांगितल