…यामुळं ज्ञानवापी मशीद प्रकरणी कोर्ट आयुक्तांची हकालपट्टी!
नवी दिल्ली : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणासाठी न्यालयाने दिलेली मुदत संपली आहे. पण, अद्याप अर्धे सर्वेक्षण बाकी असून आम्हाला दोन दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी कोर्ट आयुक्तांनी न्यायालयात केली आहे. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयीन आयुक्त अजय मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली असून सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी इतर दोन आयुक्तांना दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
दरम्यान, अजय मिश्रा यांनी वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी एका खासगी व्हिडिओग्राफरची नियुक्ती केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले आणि ते या प्रकरणाशी संबंधित मुद्द्यांवर सतत माध्यमांमध्ये बोलत होते, असेही आरोप त्यांच्यावर आहेत. त्यांच्या नि:पक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे आज न्यायालयाने त्यांची सर्वेक्षण समितीतून हकालटपट्टी केली आहे.