आधी प्रेम मग लग्न, नंतर जे सत्य समोर आलं त्याने नवरदेवाच्या पाया खालची जमीनच सरकली
मुंबई | लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. या दिवसाची सगळेच आतुरतेने वाट पहात असतात. लग्नानंतर दोघांच्याही आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते. परंतु लग्नाचे स्वप्न पाहिलेल्या एका तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला, ज्याचा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नसावा. मुंबईतील एका तरुणाने प्रेम प्रकरणानंतर आपल्या प्रेयसीशी लग्न केलं. पण तिचं सत्य काही भलतंच निघालं. कारण त्याने ज्या व्यक्तीशी लग्न केलं ती महिला नसून पुरुष आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोघांची भेट मुंबईतील एका कॉलेजमध्ये झाली होती. त्यानंतर ते दोघेही प्रेमात पडले आणि नंतर प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. हे दोघेही लग्नासाठी उत्सुक होते. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांनी लगेच होकार दिला आणि त्यांचे लग्न देखील झाले. इथपर्यंत सगळं चांगलं सुरु होतं. पण हनिमून दरम्यान बायकोने पोटदुखी आणि हर्नियाच्या बहाण्याने संबंध ठेवण्यापासून रोखले. लग्नानंतर या तरुणीने नवऱ्याला जवळ येण्यापासून रोखले.
या सर्व प्रकारामुळे तरुणाला वेगळाच संशय येऊ लागला. त्यानंतर तो आपल्या बायकोला घेऊन फिरायला गेला. तेथे त्याच्या लक्षात आले की त्याने ज्या व्यक्तीशी लग्न केलं आहे ती महिला नसुन मुलगा आहे. कारण तिचं शरीर आणि लिंग मुलांप्रमाणेच होतं. त्यानंतर या तरुणाला काय करावे हेच सुचले नाही.
त्यानंतर ही परिस्थिती हाताळत त्या वधूने नवऱ्याला सांगितले की, योनीप्लास्टीच्या शस्त्रक्रियेमुळे तिच्या शरीरात बदल झाले आहे. इमोशनल ब्लॅकमेलिंगचा सट्टा चालवणाऱ्या नववधूने सांगितले की, त्याने याबाबत दुसऱ्या कोणाला सांगितले तर ती आत्महत्या करेल. या सर्व घटनेनंतर घाबरलेल्या मुलाने आधी मौन बाळगले आणि हे रहस्य त्याने कोणालाही सांगितले नाही. पण लग्नाला इतकी वर्षे होऊनही मूल न झाल्याबद्दल नातेवाईक आणि मित्रमंडळींनी सतत अनेक प्रश्न विचारल्यावर अखेर मौन तोडून तिने हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर वधूची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तरुणाने लगेचच घटस्फोट मागितला. या प्रकरणाचा संपूर्ण तपास अजून सुरु आहे.