पोट फुटेस्तवर खाता अन् बिल मात्र बुडवता!

मुंबई : (Amol Mitkari On Sadabhau Khot) सदाभाऊ पोट फुटेस्तुवर खाल्ल, आता बिलपण द्या. तुमच्यामुळं त्या हाॅटेल मालकाच्या जिवाला धोका निर्माण होतोय अशी सगळीकडं चर्चा आहे. शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तर आंदोलन करा. आणि मग पवार साहेबांची उंची गाठायला आणखी सात जन्म जन्म वाट बघा. तर, यामागे लाल टाॅमेटोसारखे गाल असलेला नेता कोण आहे त्याचे नाव वेळ आल्यावर सांगन असे खोचक ट्विट आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
दरम्यान, पंचायत राज्य समिती दौऱ्यानिमित्त रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत सांगोल्याला होते. गाडीतून खाली उतरलेल्या खोत यांच्यासमोर कार्यकर्त्यांचा गराडा होता. त्यावेळी गर्दीतून पुढे येणारे मांजरी येथिल हाॅटेल व्यावसायिक अशोक शिनगारे यांनी खोत यांना रोखत जाब विचारत ते म्हणाले, सन २०१४ चे हाॅटेलमध्ये खाल्लेलं बिल द्या आणि मग पुढे जा. यानंतर खोत यांनी राष्ट्रवादीवर हा आरोप केला होता. त्याला उत्तर म्हणून आज मिटकरींनी खोत यांच्यावर ट्विट करत पलटवार केला आहे.