अखेर संजय राऊतांना सुनावली ईडी कोठडी!

मुंबई : (ED Custody Of Sanjay Raut) गोरेगाव येथील पञाचाळ प्रकरणी ईडीच्या पथकानी रविवार दि. 31 रोजी सकाळी 7 वाजताच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या भांडुप येथील राहत्या घरावर छापेमारी केली. नऊ तासाच्या ईडीच्या छापेमारीत साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात केली. त्यानंतर राऊतांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेण्यात आले. मात्र, रात्री उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली.
दरम्यान, आज संजय राऊतांची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर दुपारी त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयासमोर ईडीकडून राऊतांच्या चौकशीसाठी आठ दिवसांची ईडी कोठडीची मागणी करण्यात आली. तर राऊतांच्या वकीलांकडून त्यांना कोठडी मिळू नये म्हणून प्रयत्न केले. जोरदार युक्तीवादानंतर न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली आहे.
विशेष पीएमएलए कोर्टाने ईडी चौकशी सरण्यासाठी 4 ऑगस्टपर्यंत अर्थात तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली. त्यामुळे राऊत यांना आता तीन दिवस ईडीच्या कोठडीत रहावे लागणार आहे.