स्मार्ट उद्योजक

शिक्षणाचा उपयोग केला उद्योगासाठी…

कोरोनामुळे अनेक व्यवसाय मोडकळीस आले आणि उद्योजकांना नवीन संधी मिळाल्या. अशा संदिग्ध वातावरणात स्वयंरोजगाराच्या आणि उद्योजकतेच्या अनेक संधी तरुणांना खुणावत होत्या. सुरेश माने यांनी याच संधीचा फायदा घेत व्यवसाय करण्याचे निश्चित केले. स्वतःच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षणाचा व्यवसायात उपयोग करून सुरेश यांनी २०२१ ला शिवाजी चौक हिंजवडी येथे ‘राधेशाम संगणक एक्साइज’ हा व्यवसाय निवडला. या व्यवसायाच्या जोडीला आणखी काय करता येईल, याचा शोध त्यांनी चालू केला.

संगणक निगडित वापरासाठीची १०० ते १२० उत्पादने त्यांनी आज ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध केली आहेत. व्यवसाय उभारून काही होणार नाही, ते ग्राहकापर्यंत पोहोचवणे हे तेवढेच आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे त्यांनी मार्केटिंगवर जास्त भर दिला. आणल्या सर्व उत्पादनाची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवली. मार्केटिंग करताना त्यांच्या हे लक्षात आले. आपली उत्पादने योग्य गुणवत्तेची व कमी खर्चाची असणे महत्त्वाचे आहे. आज स्थितीला सर्व संगणक निगडित उत्पादने त्याच्या व्यवसायात उपलब्ध आहेत. त्याची गुणवत्ता राखून उत्तम प्रतीची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणे यासाठी ते कायम तत्पर असतात. एकदा मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे, हे मात्र सर्वस्वी नवउद्योजकांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. ती सुरेश यांच्या व्यवसायात कायमच दिसून येते.

प्रत्येक संकटाच्या मागे एक संधी दडलेली असते, असे म्हणतात. संकट जेवढे मोठे असेल, तेवढी संधीही मोठी असते. कोरोनामुळे बाजारपेठेची सर्व घडी विस्कटली होती. त्याचा फायदा घेत वेबसाईट तयार करणे, संगणक दुरुस्त करणे, नवीन सॉफ्टवेअर तयार करणे, संगणक निगडित अनेक कामे सुरेश करतात. यांच्यातल्या संशोधक आणि व्यावसायिकाने एका अर्थाने आता पूर्णपणे साद घातली आहे. किरकोळ विक्रीसाठी उत्पादननिर्मिती करून, व्यवसाय सुरू करताना दिवसाला किमान दीडशे ग्राहक व्यवसायाला भेट देतात. त्यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात १०,००० पेक्षा जास्त ग्राहक व्यवसायाशी जोडले गेले आहेत. उत्पादने वाढवत असताना ब्रँड आणि त्याची गुणवत्ता जपणारे अशी उदाहरणे फार कमी पाहायला मिळतात.

ब्रँड म्हणून ओळख निर्माण करायला त्यांना काही महिन्यांचा कालावधी लागला. मुळात संशोधनाचा पिंड असताना व्यावसायिक म्हणून बाहेर पडल्यावर व्यवसायाची गणितं बदलतात. पण सुरेश यांनी सर्व गोष्टी जुळवून आणल्या. सध्या निर्माण झालेल्या संधी ओळखून व्यवसाय घ्यावा, असे ते नवीन उद्योग सुरुवात करणार्‍यांना सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये