खडसे अॅक्शन मोडवर! भरसभेत दाखवले म्हणाले, “लाव रे तो व्हिडिओ…”; फडणवीसांचे जुने व्हायरल..
जळगाव : (Eknath Khadse On Devendra Fadnavis) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘स्वाभिमान सभा’ पार पडली. या सभेत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ लावत जोरदार हल्लाबोल केला. व्हिडिओ दाखवल्यानंतर सभेच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“देवेंद्र फडणवीस यांनी कधीही आश्वासन पूर्ण केले नाहीत. आता व्हिडिओ बघितले ना… फडणवीस एकदम खोटारडा माणूस आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल खोटं बोलले. विदर्भ वेगळा झाला नाही तरी लग्न करणार नाही म्हटले होते. मात्र त्यांनी लग्न केले. आज मराठा समाजाला मूर्ख बनवण्याच काम सुरू आहे. सरकार भावनांशी खेळत आहे. तिघांच सरकार … एक सिनियर एक ज्युनियर … दोन बायका फजिती ऐका”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.
“अजित पवार बोलेल ते करणारा नेता. मात्र आता त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. क्या हालत बना दी …. आता तुमच्या सहीनंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची सही. तुमचा स्वाभिमान गेला कुठे?, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केलं.ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते मंत्री झाले. एका भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी माझ्याविरोधात ठराव केला. आता खोक्यांमुळे माज आलाय… मस्ती आली आहे”, असं टिकास्त्र त्यांनी डागले आहे.