ताज्या बातम्यारणधुमाळी

एकनाथ खडसेंचा गिरीश महाजन यांना इशारा; म्हणाले, “हम डुबेंगे सनम लेकिन…”

जळगाव | Eknath Khadse On Girish Mahajan – राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर जळगावमध्ये भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंंगला. संजय राऊत यांच्यानंतर पुढचा नंबर हा एकनाथ खडसे यांचा असणार आहे, असा दावाच महाजनांनी केला होता. यावर आता एकनाथ खडसे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आगे. कोण म्हणतं नाथाभाऊ तुरुंगात जाईल. जायचंय तुरुंगात जाईन. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा, ‘हम तो डूबेंगे सनम, लेकिन तुमको भी ले डूबेंगे’, असं म्हणत खडसे यांनी गिरीश महाजन यांचं नाव न घेता कडक इशारा दिला.

ईडी नावाचा प्रकार आता घरोघरी पोहोचला आहे. माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन ब्युरो लागलं. असेल नसेल ते लागलं, काय झालं काहीच नाही. विरोधकांना उठलं की फक्त नाथाभाऊच दिसतो. कोण म्हणतं नाथाभाऊ तुरुंगात जाईल, जायचंय तर तुरुंगात जाईन. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा, ‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी ले डूबेंगे’ असं म्हणत एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. भोसरी प्रकरणात प्रचंड अनियमितता आहे, त्यामुळे खडसेंची जेलवारी अटळ आहे. भोसरी प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे जेलमध्ये आहेत, त्यांना जामीन मिळत नाही. भोसरी गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने कोणतीही ॲक्शन घेऊ नये, असं सूचित केलं आहे. ते हटल्यानंतर लगेचच एकनाथ खडसेंना जावयासोबत जेलमध्ये जावं लागेल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये