ताज्या बातम्यारणधुमाळी

अमित शाहंच्या भेटीवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई | Eknath Khadse – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच एकनाथ खडसे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या चर्चांवर आता एकनाथ खडसेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आपली भेट झाली नाही. काही वैयक्तिक कारणांसाठी दूरध्वनीवरून त्यांच्यासोबत चर्चा केली असल्याचं खडसेंनी सांगितलं. तसंच या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना माहिती दिली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी आपल्यासोबत शाह यांची भेट घेण्यास सांगितलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार जर स्वतः अमित शहा यांच्याकडे माझ्या सोबत येणार आहेत तर ते त्यांना मला भाजपमध्ये घ्या हे सांगण्यासाठी तर येणार नाही असा उपरोधिक सवालही एकनाथ खडसेंनी केला आहे.

भाजपमध्ये 40 वर्ष काम केलं. पक्षवाढीसाठी मोठं कष्ट केलं, महत्त्वाची पदं देखील भूषवली. मात्र, मधल्या कालखंडात माझ्यावर अन्याय होत असल्याचं मला वाटत होतं. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या कोंडीनंतर भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. त्यानंतरच्या काळात राजकारणापासून तीन वर्षे दूर होतो. राजकारणातून जवळपास बाहेर गेल्यानंतर शरद पवार यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी विधान परिषदेत निवडून आणले. ज्यांनी मला राजकीय विजनवासातून बाहेर काढले, त्या पक्षाला कसं सोडू असा सवालही त्यांनी केला.  

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये